माझे घर डोंबिवलीला आणि कॉलेज ठाण्याला होते. कॉलेजमधुन घरी जाताना पावसात भिजायला खूप मजा यायची. मुंबईच्या
धो धो पावसात छत्रिचा काहीच उपयोग नसतो. 25 वर्षांपूर्वी, आताच्या मानाने रस्ते खुपच मोकळे असायचे. तेव्हा मैत्रिणिंच्या घोळक्यात
बिनधास्त, एकमेकिंच्या अंगावर पाणि उडवत , हसत
खिदळत , भिजून घरी जायचो.
खूप तणावविरहित दिवस होते ते. लोकल
ने घरी जाताना दिवा स्टेशन गेल्यावर डोंबिवलिच्या खाडीचा परिसर हिरवागार झालेला असायचा.
संध्याकाळी खूप उशीर / अंधार झाला असेल तर असंख्य काजवे दिसायचे. लोकलच्या खिडकी आणि
दारातून येणार तो गार वारा आणि चेहर्यावर उडणारे पाण्याचे तुषार मनाला ताजंतवानं करायचे. ईथे नेदरलॅंन्ड्समध्ये खूप हिरवळ आणि पाऊस
आहे पण त्याला त्या मुम्बईच्या धो धो पावसाची सर नाही.
Comments
Very true ! Mumbai chya mansoon chi sar ethalya pawasala nahi ! :)
ReplyDelete