पावसाची एक आठवण

माझे घर डोंबिवलीला आणि कॉलेज ठाण्याला होते. कॉलेजमधुन घरी जाताना पावसात भिजायला खूप मजा यायची. मुंबईच्या धो धो पावसात छत्रिचा काहीच उपयोग नसतो. 25 वर्षांपूर्वी , आताच्या मानाने रस्ते खुपच मोकळे असायचे. तेव्हा मैत्रिणिंच्या घोळक्यात बिनधास्त , एकमेकिंच्या अंगावर पाणि उडवत , हसत खिदळत , भिजून घरी जायचो. खूप तणावविरहित दिवस होते ते. लोकल ने घरी जाताना दिवा स्टेशन गेल्यावर डोंबिवलिच्या खाडीचा परिसर हिरवागार झालेला असायचा. संध्याकाळी खूप उशीर / अंधार झाला असेल तर असंख्य काजवे दिसायचे. लोकलच्या खिडकी आणि दारातून येणार तो गार वारा आणि चेहर्‍यावर उडणारे पाण्याचे तुषार मनाला ताजंतवानं करायचे. ईथे नेदरलॅंन्ड्समध्ये खूप हिरवळ आणि पाऊस आहे पण त्याला त्या मुम्बईच्या धो धो पावसाची सर नाही.

उन्हाळ्याची सुट्टी



दिवाळीची सुट्टी संपून शाळा सुरू झाली की पालकांच्या डोक्यात उन्हाळ्याच्या सुट्टीचे प्लॅनिंग सुरु होते. यावर्षी कुठे जायचे, छोटी ट्रिप करायची की कुठेतरी लांब फिरायला जायचे ?  भारतातच जायचे की परदेशवारी?  त्यात हल्ली बर्‍याच शाळांना सलग दोन महिने सुट्टी नसते. मार्च मध्ये सुट्टी, एप्रिल मध्ये थोडी शाळा, मे मध्ये परत सुट्टी , असा काहितरी विचित्र प्रकार चालू असतो. त्या सगळ्या तारखा सांभाळून ट्रिप ठरवायची आणि तिकिटे-पासपोर्ट-व्हिसा ची कामे करायची म्हणजे तारेवरची कसरतच. पण तरी साधारण जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत सगळे ठरलेले असते. तुमचे पण ठरले असेलच. तर या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही कुठे जात आहात फिरायला ?

कृपया तुमचे उत्तर कमेंट्स मध्ये लिहा.  !!

https://smalltripsplans.blogspot.in/


Comments