प्रवासाला निघताना थोडी आधीपासून तयारी केली, नीट माहिती काढली आणी सर्व गोष्टींची नीट व्यवस्था केली की मनात चलबिचल रहात नाही आणि आपण मनमोकळेपणाने फिरू शकतो. खाली मी काही टिप्स लिहिल्या आहेत, या गोष्टी आपण नेहमी करतच असतो. मी फक्त त्याची यादी करून शेअर करत आहे.
- शक्य असेल तर कोणत्याही ट्रिपचे प्लॅनिंग कमीतकमी 5-6 महिने आधी करावे. हल्ली तसे विमानाच्या तिकिटाच्या किमतींमध्ये जास्त फरक पडत नाही पण हॉटेल्स, रेन्टल कार, ट्रेन्स तिकिट्स चे चांगले डील्स मिळू शकतात.
- Booking.com, https://www.tui.in/, https://www.groupon.com/ यासारख्या अनेक वेबसाईट्स वर खूप ऑफर्स उपलब्ध असतात.
- एखादे, आपल्याला हवे ते हॉटेल जर बूकिंग.कॉम सारख्या वेबसाईटवर उप्लब्ध नसेल तर त्या हॉटेल ला संपर्क करून चौकशी करावी व उपलब्धता असल्यास डायरेक्ट बुकिंग करावे.
- हॉटेल्स बूक करताना त्याचे रिव्ह्युझ नक्की वाचावे. त्यामुळे हॉटेल कसे असेल याची कल्पना येते. https://www.tripadvisor.in/ या वेबसाईट वर हॉटेल्स व प्र्क्षणीय स्थळे यांचे रिव्ह्युझ वाचायला मिळतात.
- सर्व बुकिंग्स / रिझर्वेशन्स चे इमेल्स घरातील इतरांनाही पाठवून ठेवावे व प्रिंट्स काढून नीट फाईल करून एकत्र ठेवावे.
- ट्रिपमध्ये कोणत्या दिवशी कोणती ठिकाणे बघणार आहोत, त्याच्या वेळा काय आहेत, ते कधी बंद असतात अशी सगळी माहिती इंटरनेट वरून काढून ठेवावी. त्या ठिकाणांची तिकिटे ऑनलाईन मिळत असल्यास काढून ठेवावी. म्हणजे प्रत्यक्ष त्या दिवशी तिकिटासाठी रांगेत उभे रहायचा वेळ वाचतो.
- आपण जिथे जाणार आहोत तिथे कोणती रेस्टॉरंट्स आहेत, लहान मुले बरोबर असतील तर त्यांच्या आवडीचे खाणे कुठे मिळू शकेल, एखाद्या ठिकाणी रात्री उशीर होणार असेल तर खाण्यापिण्याची काय व्यवस्ठा होऊ शकते , अशी सगळी माहिती काढून ठेवावी.
- थीम पार्कस मध्ये बर्याचदा खूप वेळ रांगेत , उन्हात उभे रहावे लागते. त्यावेळेसाठी छोटे स्नॅक्स, पाण्याच्या बाटल्या बरोबर ठेवाव्या.
- आपण जिथे जाणार आहोत तिथल्या हवामानाप्रमाणे तयारी करून जावे. हिवाळ्यात पुरेसे ठंडीचे कपडे, उन्हाळ्यात गॉगल्स, टोप्या , छ्त्र्या बरोबर ठेवाव्यात.
- प्रवासाच्या दिवशी टॅक्सीची गरज असल्यास ,कमीत कमी 8 तास आधी बूक करून ठेवावी.
- प्रवासाच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी घरातून निघताना (चेक) करायच्या गोष्टींची यादी करावी जसे,
- फ्रीज रिकामा करणे
- कचरा टाकून येणे
- किल्ल्यांचा एखादा सेट जवळपास राहणार्या नातेवाईक / मित्र/ खात्रीचे शेजारी यांच्याजवळ देऊन ठेवणे.
- घरात झाडे असल्यास , त्यांच्या पाण्याची व्यवस्था करणे
- सर्व मोबाईल्स, लॅपटॉप्स व त्यांचे चार्जरस बरोबर घेतले आहेत ना तपासून बघणे
- घरातील सर्व इलेक्ट्रिक ची बटने, पाण्याचे नळ बंद करणे.
- सर्व दारे-खिडक्या, गॅस, फ्रीज ची दारे व्यवस्ठित बंद करणे.
#travelblog #travelblogger #europetravelblog
Comments
Post a Comment